Posts

योग्य दिशेचे देवघर, ठरेल सुख समृद्धि चे आगर!

Image
  Table of contents देवघर - समज/गैरसमज. पश्चिमेकडील प्रार्थना स्थळे. जलाधिपती वरूण देवतेचे महत्त्व. वरूण देवाचे सहाय्यक पुष्पदंत आणि असूर देवता. वरूण देवता आणि समृद्धीचा संबंध. पश्चिमेकडील देवघराचे लाभ. समापन. ' सर्व सुखांचे आगर, करते अचूक देवघर .' ही उक्ती आपल्याकडे रूढ आहे. ते खरंही आहे . देवघराची दिशा अचूक नसेल तर दैवी कृपा आणि पुण्याचाही ऱ्हास होतो. तसेच दैवी कोपालाही माणसाला सामोरं जावं लागतं. म्हणूनच घरातील देवघराबाबत वास्तूशास्त्रात सखोल अभ्यास करून विस्तृत माहिती देण्यात आली आहे. बहुसंख्य वास्तू तज्ज्ञांनी देवघर नेहमी वास्तूच्या ईशान्य दिशेस असावे, यावर जास्त भर दिला आहे. मात्र वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे, हे सांगण्यासाठीच ह्या ब्लॉगचे प्रयोजन आहे. ज्यामुळे देवघराविषयीचे अनेक गैरसमज दूर होतील . 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती है बसेरा। वह भारत देश है मेरा॥ ' हे सुप्रसिद्ध गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ह्या गाण्यातील शब्द न् शब्द खरा आहे. एकेकाळी भारतासारखा सर्वार्थानं समृद्ध देश, जगाच्या पाठीवर नव्हता. शेती, विपूल खनिज संपत्ती, जीवन जगण्यासाठी पोषक वाताव...